महेंद्र मिसाळ संत नरहरी महाराज राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित

संघर्षनामा वृत्तसेवा । श्रीगोंदा

दि .६ फेबुवारी २०२६

प्रतिनिधी 

  श्री संत नरहरी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त सोनार समाज सेवा प्रतिष्ठान बारामती यांच्या तर्फे 4 फेब्रुवारी रोजी प्रा.महेंद्र मिसाळ यांना राज्यस्तरीय संत नरहरी महाराज पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

महेंद्र मिसाळ यांनी आजपर्यंत अनेक गावात व्याख्यानमार्फत व वृत्तपत्रात लेखणीतून शिव,शंभू,शाहू,फुले आंबेडकर तसेच अनेक संतांचे कार्य व सामाजिक विषयावर प्रबोधन केलेले आहे.त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.या प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी अन्नदान,अनाथ,गरजूंना आर्थिक मदत,शाळेत प्रथम तीन क्रमांक आलेल्यांना बक्षीस वाटप, विविध स्पर्धा असे समाजोपयोगी उपक्रम केले जातात.यावेळी देवकुळे महाराज यांचे प्रवचन झाले.या प्रतिष्ठानचे अध्यक्ष पोपटराव कुलथे व त्यांच्या सहकाऱ्यांचे सर्व स्तरामधून कौतुक होत आहे.कार्यक्रमाला प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी व पंचक्रोशीतील अनेक लोक हजर होते.अजितदादा पवार यांच्या अकाली निधनामुळे हा कार्यक्रम अगदी साध्या पद्धतीने करण्यात आला.अजितदादांना यावेळी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

Related Post