श्री संत शिरोमणी नरहरी महाराज यांची ७४० वी पुण्यतिथी सुपा येथे साजरी !!

संघर्षनामा वृत्तसेवा । श्रीगोंदा

दि .५ फेब्रुवारी २०२६     

 निघोज प्रतिनिधी ,

सुपा शहरात सराफ सुवर्णकार समाज माता-बंधू-भगिनींनी प्रचंड उत्साहाने आणि चांगल्या संख्येने नरहरी महाराजांची पुण्यतिथी साजरी केली.

दीपप्रज्वलन व महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरूवात केली.

पूजनानंतर हभप. राजेंद्र महाराज शहाणे यांचे नरहरी महाराजांच्या जीवन चरित्रावर प्रवचनाचा कार्यक्रम झाला.

त्यानंतर जमलेल्या सर्व समाज बांधवांना नरहरी महाराजांच्या प्रतिमेचे व गुलाबपुष्पाचे वाटप करण्यात आले.त्यानंतर सागर मैड यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमात ज्येष्ठ दिवंगत धडाडीचे कार्यकर्ते सर्वांचे प्रेरणास्थान नाना नगरकर यांना मौन पाळून श्रद्धांजली अर्पण केली.

त्यानंतर महाराजांची आरती होऊन महाप्रसादाचा सर्वांनीं लाभ घेतला.

Related Post