डॉ.शुभांगी गादेगावकर यांना राज्यस्तरीय साहित्यरत्न पुरस्कार

संघर्षनामा वृत्तसेवा । श्रीगोंदा

दि .२ फेब्रुवारी २०२६

प्रतीनिधी ,

दोस्ती फाउंडेशन अहिल्यानगर आयोजित लोक कलावंत पै. मजनुभाई शेख स्मृती गौरव पुरस्कार सोहळा दिनांक ३१/०१/२०२६ रोजी श्रीरामपूर येथे पार पडला. माननिय रज्जाक भाई शेख यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचे कुलपती डॉ. महावीरसिंग चौहान यांनी भूषविले. कार्यक्रमाचे उद्घाटन आरटीओ अधिकारी राणीताई सोनवणे यांनी केले. राष्ट्रीय लोक कलावंत न्याय समिती राज्याध्यक्ष संदीपकुमार बोरकर यावेळी उपस्थित होते. आनंदराव साळवे, पोलिस अधीक्षक सुभाष सोनवणे, डोंगरे साहेब आदी मान्यवरांची उपस्थिती होती. वासुदेव, गोंधळी, पोतराज, पिंगळे असे अनेक कलावंत यावेळी उपस्थित होते. लोक कलावंतांना त्यांची कला सादर करण्याची संधी देण्यात आली. लोककलांना पुन्हा पुनर्जन्म देण्याचा अतिशय स्तुत्य उपक्रम पार पडला. या कार्यक्रमाचे बहारदार असे सूत्रसंचालन रासकर यांनी केले. सर्व उपस्थित कलाकारांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या प्रसंगी साहित्य क्षेत्रातील नेत्रदीपक व दीर्घकालीन कार्याबद्दल मीरा रोड ता. जि. ठाणे येथील डॉ. शुभांगी गणेश गादेगावकर यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. अगदी खेळीमळीच्या वातावरणात पुरस्कार सोहळा पार पडला.

Related Post