संघर्षनामा न्यूज l श्रीगोंदा
दि.४जुलै २०२४
प्रतिनिधी/पिंपळा
आष्टी तालुक्यातील पिंपळा धनगरवाडी येथे संत बाळूमामाच्या नऊ नंबर पालखीचे आगमन झाले आणि अकराव्या दिवसाच्या कीर्तन सेवा ह.भ.प.दिंडे तेजसश्रीताई यांच्या वाणीतून संपन्न झाली.संतांच्या,वैष्णवांच्या सहवासात होणाऱ्या संत बाळूमामा या महोत्सवाद्वारे पिंपळा धनगरवाडीकरांना भक्तिरसात न्हाऊन निघण्याचा अनुभव घेता येणार आहे.संत बाळूमामा टाळ मृदंगाचा निनाद,हरिनामाच्या गजरात आध्यात्मिक आणि अध्यात्मातून सामाजिक विचारांची शिदोरी या महोत्सवाच्या निमित्ताने भाविकांना मिळत आहे.हा महोत्सव सर्वांसाठी खुला आहे.या महोत्सवात अधिकाधिक भाविकांनी सहभागी व्हावे.विठोबा रखुमाई..... विठोबा रखुमाई.... असा जयघोष अन् विठूनामाच्या गजरात आषाढी वारीला सुरुवात झाली असताना.पिंपळा धनगरवाडीकरांना या भक्तीच्या महासागराची अनुभूती लाभावी म्हणून संत बाळूमामा नाचू कीर्तनाचे रंगी या कीर्तन महोत्सवाचे आयोजन केले आहे.या कीर्तनामध्ये ह.भ.प.तेजसश्रीताई दिंडे यांनी बाळूमामा विषयी त्यांचा जीवनपट सांगण्याचा प्रयत्न केला.बाळूमामा हे एक संत विचारिक होते पण त्यांचे विचारधारणा त्यांच्या घरातील लोकांना कधीच पटले नाही.पण ज्यांना पटेल त्यांनी त्यांचे विचारधारा साध्य करून घेण्याचे काम केले.आणि बाळूमामा संत बाळूमामा झाले असे कीर्तनातून बोलताना देव आहे देव आहे हृदय मंदिरी शोधूनी पाहे हा अभंगावर ह.भ.प.तेजसश्रीताई दिंडे यांनी सांगितले.यावेळी हजारोच्या संख्येने भाविक भक्त या पालखीचे दर्शन घेण्यासाठी पिंपळा.काकडेवाडी.धनगरवाडी.सुंबेवाडी.नांदूर येथुन तोबा गर्दी होताना दिसत आहे.पंचक्रोशीतून भाविक भक्त या पालखीचे दर्शन घेण्यासाठी येत आहे.